Tiranga Times Maharastra | नगरपरिषद निकालानंतर शिंदे गट आक्रमक
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होताच शिंदे गटात मोठा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. स्वबळावर लढत 57 जागा जिंकल्यानंतर शिंदे गटाने आता भाजपसमोर सन्मानजनक जागावाटपाची मागणी केली आहे. राज्यात होणाऱ्या 29 महापालिका निवडणुकांमध्ये योग्य जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे संकेत शिंदे गटाच्या नेत्यांकडून दिले जात आहेत. त्यामुळे मुंबईपासून नागपूरपर्यंत भाजपची चिंता वाढण्याची शक्यता आहे.
